मार्केटिंगचे फंडे


प्रोडक्ट, पोझिशन, प्लेस अँड प्रमोशन, पोस्ट प्रमोशन हे मार्केटिंग जार्गन्स आहेत. मार्केटिंग म्हटंल की या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो. विक्री कलेला सध्यस्थितीत जबरदस्त महत्त्व प्राप्त झालं आहे, जो विक्री शिकला तो व्यवसायात यशस्वी झाला. थोडक्यात व्यवसायाचं नव्हे तर कोणत्याही यशाच गमक विक्री कलाच आहे असं म्हटल तर वावग ठरणार नाही....काय मगं जाणून घेऊया याविषयी थोडक्यात..........सध्याचे युग हे मार्केटिंगचे युग आहे असे म्हटलें तर वावगे ठरणार नाही. व्यावसायिक क्षेत्रातच नव्हे तर अव्यावसायिक क्षेत्रातही मार्केटिंगला जबरदस्त महत्त्व प्राप्त झाले आहे.कोणतेही साधे उत्पादन असो अथवा सेवा विकण्यास एवढी स्पर्धा निर्माण झाली आहे की, विक्री वाढविण्यासाठी नवनवीन तंत्राचा वापर केला जात आहे. मल्टीनॅशनल कंपन्या विक्रीसाठी सातत्याने विचारविनिमय करुन त्यानुसार मार्केटिंग पॉलिसीज् तयार करत आहे. थोडक्यात जमाना ‘आर्ट ऑफ सेलिंगचा ’आहे. विक्री कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.आपले उत्पादन, आपली सेवा आणि आपली कल्पना ग्राहकांच्या गळी सहज उतरवता येणे म्हणजे विक्री कला आहे का?


विक्री कला ही उपजत असावी लागते हा भ्रम काढून टाका


विक्री कला ही काही उपजत कला नाही. कोणतीही गोष्ट शिकल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय तितकीशी सादर करता येत नाही. बहुतेकवेळा विक्रीकला ही उपजत असावी लागते अशा गैरसमजात राहिल्यामुळे आमचा बाळ्या लबाड नाही, त्याला विकता येणार नाही, त्याला बोलता येणार नाही अशी वाक्य लोक बोलताना दिसतात. म्हणजे विक्रेता काय लबाड असतो, कोणतीही गोष्ट अथक प्रयत्नांनंतरच साध्य होते हे निर्विवाद सत्य आहे. विक्रीकलेती मूलतत्वे नक्कीच शिकता येतात आणि अनुभवातून त्याला वेगळी लकाकी प्राप्त होऊ शकते. व्यावसायिक दृष्टीकोन असणाऱया कित्येक कंपन्या सेल्समॅन ट्रेनिंग अॅरेंज करतात? त्यासाठी कितीतरी पैसे खर्च करतात. कारण प्रशिक्षणाशिवाय पर्यायच नाही. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीच ट्रेनिंग मिळत त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट अधिक कौशल्याने करु शकता.


ग्राहकांच्या गरजा जाणून घ्या


बहुतेकवेळा एखादा सेल्समन / सेल्सगर्ल तुमच्या दाराशी येते आणि आमच्याकडे विविध प्रकारची अशी विविध उत्पादने आहेत, आमच्याकडे हे आणि ते आहे, असं आहे आणि तसं आहे हे सांगताना एकदा सुरु झालेली कॅसेट संपेपर्यंत समोरचा ग्राहक कंटाळतो. केवळ वाचाळ अथवा बडबडत राहणे म्हणजे विक्री कला नाही. तर ग्राहकांच्या गरजा काय आहेत, त्याचे म्हणणे ऐकून घेणे, ग्राहकाला नेमक काय हवे आहे याची कल्पना येऊ शकते. अन्यथा विक्रेता बोलत राहतो आणि बहुतेकवेळा ग्राहक कंटाळून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो.


प्रोडक्ट/ सर्विस (उत्पादन/ सेवा)


तुम्ही जे उत्पादन विकणार आहात, ते कोणत्या स्वरुपाच आहे अथवा जी सेवा तुम्ही देणार आहात त्याचा दर्जा कशा स्वरुपाच आहे, हे सारच शोधाव लागणार आहे. तुम्ही जे प्रोडक्ट विकणार आहात, त्याविषयी तुमचं मत पडताळून पहा. तुम्ही स्वत जर त्या प्रोडक्टविषयी अथवा सेवेविषयी कनव्हिन्स झालात तर नक्कीच अंतप्रेरणेने तुम्ही ते चांगल्या प्रकारे विकू शकता.


पोझिशनिंग (Positioning)


तुम्ही जे उत्पादन विकणार आहात किंवा सेवा देणार आहात त्यासाठीचे टार्गेट ऑडियन्स (म्हणजेच संभाव्य ग्राहक ) तुम्हाला माहित असले पाहिजेत. म्हणजे जे उत्पादन तुम्ही विकणार आहात त्यासाठी असलेला तुमचा ग्राहकवर्ग, त्याचे वय, त्याच्या आवडीनिवडी या गोष्टी प्रामुख्याने येतात. उदा. लहानमुले तुमचे ग्राहक असतील त्यासाठी केवळ लहानमुलेच नव्हे तर शाळा, क्लासेस आणि त्यांचे पालकवर्ग हे ही तुमचे ग्राहक असतील.


प्लेस (Place)


तुम्ही ते प्रोडक्ट कुठे विकणार आहात, डिस्ट्रीब्युशन चॅनेल (वितरण साखळी) याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. तर तुम्हाला तुमचे उत्पादन अथवा सेवा प्रभावीपणे विकता येईल.


प्रमोशन (Promotion)


प्रोडक्ट/ उत्पादन आणि सेवा याचे प्रमोशन कसं करता येईल म्हणजे ते खऱया अर्थाने मार्केट मध्ये कसे प्रमोट करता येईल.


पोस्ट प्रमोशन ( Post Promotion)


तुम्ही एखाद्या ग्राहकाला जेव्हा भेटता तेव्हा केवळ त्याला उत्पादनाविषयी सांगून त्याची उत्पादनाविषयी/सेवेविषयी प्रतिक्रिया समजून घ्या. त्याच्या अपेक्षा जाणा आणि त्याला एखादे उत्पादन विकल्यावरही त्यानंतर त्याला विक्रीपश्चात सेवा द्या.


आता एवढ्या मार्केटिंग आणि सेल्स टीप्स मिळाल्यानंतर नक्कीच दि आर्ट ऑफ सेलिंग आपणाला उपयोगी पडेल असे वाटते.


0 comments