top of page

तुमच्या उद्योगाच ठराविक उद्दिष्ट ठरवा
उद्योगातील उद्दिष्ट पुर्णत्वाला नेण्यासाठी...


आपल्या उद्योगाच्या वृद्धीचे, त्याच्या नफ्याचे, त्यातून मिळणाऱया उत्पन्नाचे विशिष्ट उद्दिष्ट ठरवा व ते गाठण्याचा कालावधी निश्चित करा. उद्योगाचे उद्दिष्ट ठरवले की, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा,प्रत्यक्ष कामाला लागा. आपण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठा जे मार्ग अवलबंले आहेत, अथवा जी पाऊले उचचली आहेत, जे प्रयत्न करत आहोत, त्याचा आढावा घ्या. त्यातून साधलेल्या परिणामांचा अभ्यास करा. अपेक्षित व्यवसायिक उद्दिष्ट मिळेपर्यंत प्रयत्न बदल/ सुधारणा थांबवू नका.

उद्योगातील मिळकत वाढविण्यासाठी


तुम्हाला किती मिळकत करायची आहे, त्याचा आकडा निश्चित करण महत्त्वाच आहे. उदा. “मला दहा लाख, वीस लाख, चाळीस लाख माझ्या उद्योगातून मिळवायचे आहेत’’,असा निश्चित आकडा असणे गरजेचे आहे. उद्योगातील मिळकतीचे चित्र स्पष्ट झाले की, एवढे कमविण्यासाठी माझे उत्पादन/ सेवा काय आहे, त्यातून इतरांना काय मिळेल, आणि ते मिळविण्यासाठी माझ्याकडे काय नियोजन आहे ? याचा गाभींर्याने विचार करा. तुम्ही उद्योगातील मिळकतीचा जो आकडा निश्चित केला आहे. ते तुम्हाला वर्षात, दोन वर्षात की पाच वर्षात मिळवायचे आहेत, त्याचा अंतिम कालावधी निश्चित करा.


आपण व्यवसायिक मिळकतीचा ठरवलेला आकडा, आपण ठरवलेल्या कालावधीत मिळविता येईल याचा निश्चित आराखडा, ठोस योजना एका कागदावर मांडा, आणि ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी कामाला लागा..आपण व्यवसायिक मिळकतीचा ठरवलेला आकडा, आपण ठरवलेल्या कालावधीत मिळविता येईल याचा निश्चित आराखडा, ठोस योजना एका कागदावर मांडा, आणि ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी कामाला लागा. तुमच्या योजनेवर तुमचा विश्वास असण आवश्यक आहे. एका कागदावर तुमची मिळकत,त्यासाठी निश्चित केलेला कालावधी,त्यासाठी तुम्ही राबविणार असणाऱया योजना लिहा.आणि सकाळी व सांयकाळी एकांतात मनापासून ते वाचा. मी ठरविलेले उद्दिष्ट पूर्णच होईल अस मनोमन म्हणा, एकप्रकारची ही स्वंयसूचनाच आहे.तुम्हाला हे जरा हास्यास्पद वाटल, तरी विश्वास ठेवून केलत तर ही कल्पना नक्कीच कामी येईल. आपण आपण व्यवसायात यशस्वी होऊ, ठराविक उत्पन्न आपण मिळवू ही केवळ आशा नाही, तर विश्वास आणि खात्री असण तेवझच आवस्यक आहे. उद्योगात यशस्वी व्हायच असेल तर नुसती इच्छा नाही तर धगधगती इच्छा हवी.

तुमच्याकडे नैसर्गिक बुध्दीमत्ता आहे, पण केवळ बुद्धीमत्ता असून उपयोग नाही तर तिचा पुरेपुर उपयोग करुन घेण्याची वृत्ती हवी. हुशार आहे बुध्दीमान आहे पण पुढे काय? उद्योगात स्वततील क्षमता ओळखून त्याचा पुरेपूर वापर करुन त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करणे, सराव करणे, प्रयत्न करणे, त्यातील यशासाठी अचूक तंत्राचा अवलंब करणे आणि व्यवहारज्ञान असण तितकच महत्त्वाच आहे. उद्योग करायचा आहे, थोडे हातपाय हालवा, जरा डोक चालवा, थोडसं धाडस दाखवा, जोखीम उचला, प्रयत्न करा, कल्पनेला चालना द्या, बुद्धीला ताण द्या, अचूक संधी हेरा, संधीच सोन करा, हरलात जरी तुम्ही, मनाला हारुन देऊ नका जिंकण्याची उर्मी बाळगा मग कोण रोखू शकेल तुम्हाला स्वउद्योगाच्या स्वप्नावर स्वार होण्यावाचून?


0 comments

Comments


bottom of page